Monday, January 13, 2020


सप्रेम नमस्‍कार,
आपणांस कळविण्‍यात आनंद होत आहे की महाराष्‍ट्र पक्षीमित्र संयोजित २० वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन दि. ०८-०९ फेब्रूवारी २०२० या कालावधीत लोणार जि. बुलढाणा येथे ‘मी लोणारकर’ तर्फे वन्यजीव विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्‍यात आले आहे. या सम्‍मेलनात सहभागी होण्‍यासाठी आग्रहाचे निमंत्रण…..
संमेलनाच्‍या नोंदणीकरीता तपशिल 
बाबदि. ३१ जाने २०२० पर्यंत नोंदणी दि १ फेब्रु २०२० पासून पुढे आणि स्थळनोंदणीसाठीसमावेश
नोंदणी६००८००
दि. ०८ फेब्रू रोजी दुपारी चहा + नाश्‍ता + रात्रीचे जेवन,
दि. ०९ फेब्रू रोजी सकाळी चहा + नाश्‍ता + दुपारचे जेवन + चहा.
नोंदणी + निवास८००१०००संमेलनस्‍थळी निवासासह वरीलप्रमाणे
लोणार सरोवर परिक्रमा१००१००गाईड, प्रवेश शुल्‍क इ.

संमेलनात सहभागी होण्‍यासाठी सभासदांना नोंदणी करणे आवश्‍यक आहे. संमेलनात सहभागी होण्‍यासाठी तथा वेळेवरची गैरसोय टाळण्‍यासाठी आपण ऑनलाईन पद्ध्‍तीने सहभागी होणे सोईस्‍कर राहील. याकरीता अतिशय सोप्‍या पद्धतीने नोंदणी देणगी रक्‍कम अदा करून खालील अर्ज भरावा.
आरटीजीएस / एनईएफटी साठी बॅंकेचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
Name of Account – Mi Lonarkar
Bank Name – The Chikhli Urban Co-Op Bank Ltd Lonar.
Type of Account – Current
Branch – Lonar
Account Number – 022011100000169
IFSC – YESB0CCUB22 ( 5th letter is Zero)
देय रक्‍कम अदा केल्‍यानंतर ऑनलाईन नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा.
नोंदणी शुल्‍क आणि फॉर्म आयोजकांना प्राप्‍त झाल्‍यानंतर आपला प्रवेश निश्चित झाल्‍याचा ई-मेल / संदेश आपणांस मिळेल.

लोणारला कसे पोहचाल
बस सुविधा – लोणार हे अकोल्‍यावरून 126 कि.मी., अमरावती वरून 222 कि.मी. (अकोला मार्गे), 203 कि.मी. (कारंजा मार्गे), नागपूरवरून 356 कि.मी. (359 कि.मी. वर्धा-यवतमाळ मार्गे), औरंगाबादवरून 138 कि.मी. ( जालना-नाव्‍हा-सिंदखेड राजा-दुसरबिड-किनगावजट्टू मार्गे) तर बुलढाण्‍यावरून 88 कि.मी. आहे .
रेल्‍वे सुविधा – जवळचे रेल्‍वे स्‍थानक अकोला-126 कि.मी., शेगाव -110 किमी, जालना-80 कि.मी. परभणी -120 कि.मी. आहे.
लोणार मधील हॉटेल्‍स (आपण कॉल करून आपला मुक्काम बुक करू शकता )
अ. क्र.हॉटेलचे नावसंपर्क व्यक्ती  संपर्क
महाराष्ट्र पर्यटक संकुल (MTDC)दिलीप राठोड 8806363498mtdcrrs.maharashtratourism.gov.in/ 
2हॉटेल गितमसचिन कापुरे 8888188508
3हॉटेल कृष्णागणेश मापारी9420623777
4फॉरेस्‍ट रेस्‍ट हाऊसऑनलाईन बुकिंगwww.magicalmelghat.com/
5लोणार अर्बन गेस्‍ट हाऊसनिलेश जाजडा9623335244

संमेलनाच्‍या कार्यक्रमाची रूपरेषा आपणांस लवकरच कळविण्‍यात येईल. लोणारचे पक्षीवैभव, जैवविविधता, उल्‍कापाती विवर पाहण्‍यासाठी आपण तथा आपल्‍या जवळचे निसर्ग आभ्‍यासक, पक्षीमित्र यांनी 20 व्‍या विदर्भ पक्षीमित्र संमेलनास उपस्थित राहून संमेलन यशस्‍वी करण्‍यासाठी सहकार्य करावे ही विनंती.
आपला विश्वासू
अरुण मापारी  (8888022099)
कार्याध्‍यक्ष
विदर्भ पक्षीमित्र संमेलन, लोणार

सप्रेम नमस्‍कार, आपणांस कळविण्‍यात आनंद होत आहे की महाराष्‍ट्र पक्षीमित्र संयोजित २० वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन दि. ०८-०९ फेब्रूवारी...