दिवसेंदिवस वाढत असलेल्या आपल्या लोणार सरोवराच्या पाण्यामुळे परिसरात असलेली शेकडो वर्षांची मंदिरे बुडाली आहेत. लोणार सरोवर आणि विवराची हजारो वर्षांपासूनची वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता या घटनेमुळे धोक्यात येते की काय असा प्रश्न उभा राहिला.
एका बाजूला नागरिकांमध्ये क्षोभ वाढत आहे आणि दुसरीकडे या ठिकाणाचे ऐतिहासिक, वैज्ञानिक, भौगोलिक महत्त्व धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
या प्रश्नावर तत्काळ उपायोजना करण्यासाठी काल मा. नगराध्यक्ष भूषण मापारी यांच्यासोबत जिल्हाधिकारी महोदयांची बुलढाणा येथे भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. शासनाची समिती अभ्यास करेल आणि त्यांच्या सूचना सादर करतील पण तोवर कदाचित उशीर झालेला असेल. म्हणून वाढणाऱ्या पाण्याचे तत्काळ नियंत्रण करण्यायोग्य उपाययोजना जिल्हाधिकारी महोदयांना सुचविली.
या उपाययोजनेमुळे सरोवराच्या पाण्यामध्ये दर तासाला सुमारे 60000 लिटर भर पाडणारे पाणी थांबविता येऊ शकते. ही उपाययोजना सुचविण्यासाठी आणि आकडेवारी जमा करण्यासाठी भूगर्भशास्त्राचे प्रा अशोक तेजनकर सर, आमचे मित्र विलास जाधव, संतोष जाधव आणि इतरांची मदत झाली.
सर्व नियमांच्या अधीन असलेली ती कल्पना समजून घेतल्यानंतर त्यांनाही ती पटली आणि तत्काळ संबंधित विभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना करून कामाला सुरुवात करण्यास सांगितले.
आपण चांगली उपायोजना सुचवली याबद्दल त्यांनी कौतुकही केले. शिवाय लोणार नगर परिषदेसाठी भूषण मापारी आणि टीमला भविष्यातील कामांविषयी त्यांच्या प्रशासकीय अनुभवातून योग्य त्या सूचना सुद्धा केल्या. चांगल्या कामासाठी प्रशासन नगरपालिकेच्या मदतीसाठी तत्पर राहील अशी त्यांनी ग्वाही दिली.
No comments:
Post a Comment